‘टाइमपास 2’ची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई

सोमवार, 4 मे 2015 (12:50 IST)
दगडू आणि प्राजूच्या टाइमपास 2 ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली आहे. रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘टाइमपास 2’ ने रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ सिनेमाचा विक्रम मोडीत काढला. ‘टाइमपास 2’ ने पहिल्याच दिवशी 3 कोटी 80 लाखांचा गल्ला जमवला आहे. तर ‘लई भारी’ने पहिल्या दिवशी 3 कोटी रुपयांची कमाई केली होती. दिग्दर्शक रवी जाधवचा ‘टाइमपास’ या सिनेमाचा सिक्वेल ‘टाइमपास 2’ या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सलग आलेल्या सुटय़ांमुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली आणि ‘टाइमपास 2’ ला पहिल्याच दिवशी मोठी ओपनिंग मिळाली आहे. त्यामुळे आता आठवडय़ाभरात ‘टाइमपास 2’ तिकीट बारीवर किती कमाई करणार हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा म्हणजे दगडू आणि प्राजक्ता यांच्या लव्हस्टोरीचा पुढचा भाग. 15 वर्षानंतर या दोघांच्या या प्रेमकहाणीचं काय होतं, त्यांच्या या नात्याला माधवराव लेले अर्थातच वैभव मांगले यांच्याकडून होकार मिळतो का, हे पाहण्यासाठी या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता दिसत आहे. 

वेबदुनिया वर वाचा