‘ग्लॅमरस’ सई बनली ‘देसी गर्ल’

सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (09:53 IST)
ग्लॅमरस, हॉट, बोल्ड अंदाज असणार्‍या सईच्या रुपाची जादू फिल्म इंडस्ट्रीत तर आहेच पण लाखो मुली तिला फॉलो करताना दिसतात. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आग्रहाने घेतलं जातं. ब्रेन वीथ ब्यूटी असं पर्फेक्ट कॉम्बिनेशन सईमध्ये पाहायला मिळतं. 
 
तिने आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका वेगवेगळ्या शेड्सच्या आणि जॉनरच्या होत्या. 
 
‘तू ही रे’ च्या निमित्तानेदेखील आपल्याला एक वेगळीच सई पाहायला मिळणार आहे. छोट्या गावात राहणारी कंप्लीट देसी गर्ल. तोंडी गावरान भाषा, सोज्वळ स्वभावाची नंदिनी जिला आपला भावी नवरा आपला प्रियकर असावा अशी इच्छा असते. तिच्यावरती चित्रित झालेलं सुंदरा हे गाणं तिच्या रूपाचं आणि गुणांचं हुबेहूब वर्णन करणारं आहे. 
 
त्याचबरोबर नंदिनी आपल्याला मॉडर्न, सेक्शुअस अशा हटके रूपात ‘तू ही रे’ सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. येत्या 4 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

वेबदुनिया वर वाचा