सैराट चित्रपटाच्या निर्मात्यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केला आहे का, याची चौकशी आता होणार आहे. सैराट सिनेमाची कथा बोभाटा कादंबरीवर बेतल्याचा दावा लेखक नवनाथ माने यांनी केला होता. निर्मात्यांची चौकशी करण्याचे आदेश पनवेल न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.