नुकताच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वच थिएटर्सच्या बाहेर हाऊसफुल असल्याचे बोर्ड झळकत आहेत. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रिंकू राजगुरु नववीची परीक्षा पास झाली आहे.