मानसीच्या ‘बाई वाडय़ावर या’चा धुमाकूळ

रविवार, 7 ऑगस्ट 2016 (21:26 IST)
ज्येष्ठ अभिनेता निळू फुलेंचा ‘बाई वाडय़ावर या’ हा जगप्रसिद्ध डायलॉग आहे. आता हाच डायलॉग गाण्यात शीर्षक-शब्द वापरून एक धमाल गाणे तयार करण्यात येणार आहे याची चर्चा सर्वत्र होती. 
 
आता या गाण्याची चर्चा अजून होणार कारण सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्यात आपल्याला मानसी नाईक दिसणार आहे.
 
नृतंगना मानसी नाईकने ‘जलसा’या आगामी मराठी चित्रपटातील ‘बाई वाडय़ावर या’ या गाण्यावर नृत्य 
सादर केले आहे. मानसीसोबत आशुतोष राज आणि निखिल वैरागर हे या गाण्यात थिरकताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 
 
या गाण्याला दमदार आवाज आनंद शिंदे यांनी दिला आहे तर समीर साप्तीसकर यांनी हे गाणे संगीतबध्द केळे आहे. ‘बाई वाडय़ावर या’ या गाण्यातून उत्तुंग कलाकार निळू फुलेंना आदराने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा