मकरंद अनासपुरेच्या ‘रंगा पतंगा’ या आगामी मराठी चित्रपटाचा पहिलावहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला असून या चित्रपटात एका शेतकर्याची कथा मांडण्यात आली असून मकरंद अनासपुरे आणि संदीप पाठक यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. ‘रंगा पतंगा’ या चित्रपटाची पुणे येथील पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड झाली आहे.
यांच्यासोबतच या चित्रपटात नंदिता धुरी, सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे, गौरी कोंगे, अभय महाजन, हार्दिक जोशी आणि आनंद कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.