दक्षिण भारतीय भाषांमध्ये यशस्वी झालेल्या चित्रपटांची रिमेक हिंदीमध्ये आपण अनेक वेळा पाहिली आहे. सलमान खानचा गेल्या वर्षी हिट झालेला वांटेड असो वा या शुक्रवारी प्रदर्शित होणारा शाहीद-करीनाचा मिलेंगे-मिलेंगे दक्षिण भारतीय चित्रपटांचीच रिमेक आहे. याची आठवण येण्याचे कारण मिलेंगे मिलेंगेबरोबर प्रदर्शित होणार मराठी चित्रपट टाटा, बिर्ला आणि लैला. या चित्रपटाचे दिग्दर्शन छोट्या पडद्यावरील यशस्वी दिग्दर्शक राजू पार्सेकर याने. वेबदुनियाशी विशेष गप्पा मारताना राजूने सांगितले की माझा हा चित्रपटांची यशस्वी तेलुगु चित्रपट टाटा, बिर्ला अधेलू लैला चा मराठी रिमेक आहे.
टाटा, बिर्ला आणि लैलाबद्दल माहिती देताना राजू पार्सेकरने सांगितले, इना मीना डिकानतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या परंतु मी मालिकांमध्ये व्यस्त असल्याने चित्रपट करू शकत नव्हतो. निर्माता जे. सी. गुप्ता आणि सुभाष शर्मा यांच्यासाठी मी डार्लिंग डार्लिंग आणि देवरानी जेठानी मालिकांचे दिग्दर्शन केले होते. ते एक चित्रपट बनवू इच्छित होते. त्यांनी मला चित्रपटाबद्दल विचारले तेव्हा मी त्यांना सांगितले की मी कलाकार आणून देईन दिग्दर्शन तुम्ही दुसर््या दिग्दर्शकाकडून करून घ्या. ते या गोष्ठीला तयार झाले. आम्ही कथेचा शोध घेऊ लागलो. कथेच्या शोधात असतानाच मी दक्षिण भारतीय भाषांमधील चित्रपट पाहाण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये सुपरहिट झालेला तेलुगु चित्रपट टाटा, बिर्ला अधेलू लैला मी पाहिला. तो मला खूपच आवडला. मी निर्मात्यांना सांगितले की यावर चांगला मराठी चित्रपट तयार होऊ शकतो. त्यांनाही ती कल्पना आवडली. त्यांनी मूळ चित्रपट निर्मात्याकडून रिमेकचे हक्क घेतले आणि गेल्या डिसेंबरमध्यें आम्ही चित्रपट सुरू केला. त्यांनी माझ्यावरच दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. मलाही कथानक आवडले असल्याने मी नाही म्हणून शकतो नाही. भरत जाधव आणि अशोक सराफबरोबर मी काम केले असल्याने त्यांच्याशी माझे चांगले संबंच्च् होते. चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठी मला हे दोघेही योग्य वाटले. मी त्यांच्याशी संपर्क केला आणि चित्रपटाबाबत सांगितले तेव्हा ते लगेच तयार झाले. दक्षिणेचे चित्रपट फारच भडक असतात, त्यांचे संवादही थोडे अश्लील असतात. मराठी प्रेक्षकांचा विचार करून आम्ही कथेत बदल केला, त्याचप्रमाणे अनावश्यक दृश्यांना कात्री लावली. फक्त २१ दिवसात मी चित्रपट पूर्ण केला. शा केवळ दोन तासांचा चित्रपट आहे ज्यात ३ गाणी आहेत. यापैकी एक आइटम साँग आहे. सिच्युएशनल कॉमेडीवर आधारित हा चित्रपट आहे. निर्मात्याने चित्रपटाच्या प्रमोशनवर प्रचंड खर्च केलेला आहे. खरे तर मराठी चित्रपट चांगले असतात परंतु त्यांचे योग्यरित्या मार्केटिंग केले जात नाही त्यामुळे चित्रपटाची हवा होत नाही. परंतु आता निर्मात्यांना मार्केटिंगचे महत्व कळले आहे.
चित्रपटाच्या कथनकाबद्दल राजू पार्सेकरने सांगितले, टाटा बिर्ला म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर श्रीमंत व्यक्तीची प्रतिमा उभी रहाते. या नावांमध्येच एक जादू आहे. चित्रपटाची कथा अशा मामा-भाच्यांची आहे जे चोर आहेत. या भूमिका अशोक सराफ आणि भरत जाधवने साकारल्या आहेत. श्रीमंत होण्यासाठी ते छोटया मोटया चोर्या करीत असतात. ते आपली खरे नावे लपवून टाटा आणि बिर्ला नावे घेतात. लक्ष्मी इंडस्ट्रीजचे मालक आणि शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक भोलाशंकर कोल्हे याツच्या एकुलत्या एका मुलीला लक्ष्मीला (शीतल जाधव) ला मारण्याचे कारस्थान रचले जाते. टाटा बिर्ला योगायोगानेच या घटनेता गुंततात. एक अनोळखी व्यक्ती त्यांना लक्ष्मीच्या घरी कामासाठी पाठवते. त्यांना सांगितले जाते की काम काय आहे ते नंतर सांगितले जाईल. हे दोघेही लक्ष्मीच्या घरात प्रवेश करतात. भरत जाधव लक्ष्मीच्या म्हणजेच शीतल जाधवच्या प्रेमात पडतो. त्यांना जेव्हा कळते की लक्ष्मीला मारण्यात येणार आहे तेव्हा हे दोघेही लक्ष्मीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. चित्रपटाचे शूटिंग आम्ही मुंबई, गोवा आणि कोल्हापुर येथील शालिनी पॅलेस येथे केले आहे.
या चित्रपटापूर्वी राजू पार्सेकर टीनएजर्स नावाच्या एका मोठ्या चित्रपटावर काम करीत होता. पार्सेकरने सांगितले, या चित्रपटावर मी खूप मेहनत घेतली होती. नवीन कलाकारांना शिकवण्याचे काम केले. ३ इडियटप्रमाणेच या चित्रपटाची कथा होती परंतु निर्मात्याने काही अडचणींमुळे हा चित्रपट बंद केला. मला चांगला निर्माता मिळाला तर पुन्हा मला या चित्रपटावर काम करणे आवडेल. या व्यतिरिक्त सध्या मी माझ्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कॉन्स्टेबल चित्रपटावर काम करीत आहे. याची निर्मिती व्ही. जी. प्रोडक्शन चे व्ही. कुमार आणि कंपनीचे क्रिएटिव हेड प्रसिद्ध गीतकार समीर पांडे करीत आहेत. त्यांनी नायकाच्या भूमिकेसाठी रितेश देशमुख आणि त्याच्या पित्याच्या भूमिकेसाठी बोमन इरानीशी बोलणी सुरु आहेत. लवकरच याची घोषणा केली जाईल. माझा लाठीचार्ज नावाचाही एक चित्रपट तयार आहे परंतु निर्माता परदेशी गेला असल्यामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही.
छोटया पडद्यासाठी राजू पार्सेकरने हम सब एक हैं, मेरी बीवी वंडरफुल, हम पांच, नॉक नॉक कौन है, रोशनी, विलायती बाबू, राजू, राजा राजासाब इत्यादि मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच पाकिस्तान आणि दुबईमधील चॅनेल्ससाठीही काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
सध्या छोटया पडद्यासाठी काय विचारता पार्सेकरने सांगितले, कलर्स चॅनेलसाठी मेट्रो पोलिस नावाची एक मालिका दिग्दर्शित करीत आहे. चेतन हंसराज यात मुख्य भूमिका साकारीत आहे. या मालिकेचे चित्रिकरण आम्ही लवकरच सुरु करणार आहोत.