गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर झी टॉकीजचे इंस्ताग्राम लाँच

शुक्रवार, 27 मार्च 2015 (17:54 IST)
२४ तास मराठी चित्रपट प्रेक्षिपीत करणारे एकमेव चॅनल ‘झी टॉकीज’ आता पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध करतं आहे. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झी टॉकीज इंस्ताग्राम हे तरुणांमध्ये प्रसिद्ध असणा-या डिजीटल प्लॅटफॉर्म जॉईन करणार आहे.
 
आपल्या इंस्ताग्राम जॉईन करण्याच्या निर्णयाने या डिजीटल प्लॅटफॉर्मवरील झी टॉकीज पहीले चॅनल ठरेल. आपल्या इंस्ताग्राम जॉईन करण्याच्या निर्णयाने या डिजीटल प्लॅटफॉर्मवरील झी टॉकीज पहीले चॅनल ठरेल.  झी टॉकीजला इंस्ताग्राम वर सपोर्ट करताना सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, मानसी नाईक, पूजा सावंत, क्रांती रेडकर आणि मानसी मोघे या लोकप्रिय अभिनेत्रींनी झी टॉकीजची गुढी हातात घेऊन आपले सेल्फी क्लिक केले. हेच सेल्फी झी टॉकीजच्या इंस्ताग्रामवर पोस्ट करुन झी टॉकीजने आपल्या इंस्ताग्राम अकाऊंटचा शुभारंभ केला.
 
आपल्या या निर्णयाविषयी बोलताना झी टॉकीजचे बिजनेस हेड बावेश जनवलेकर यांनी सांगितले की, “आपल्या या निर्णयाने आम्ही अधिकाधीक प्रेक्षकांसोबत आम्ही जोडले जाऊ असा आम्हाला विश्वास वाटतो. झी टॉकीज हे मराठी मातीशी जोडलेलं चॅनल आहे. आणि मराठी प्रेक्षकांना अधिकाधीक नवीन गोष्टी देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत राहू.” इंस्ताग्राम वर उपस्थित असणा-या सर्व मराठी प्रेक्षकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरेल यात शंका नाही.
 

वेबदुनिया वर वाचा