तो म्हणाला, मी लवकरच मराठी चित्रपटाची केवळ निर्मिती करणार नाही तर त्या चित्रपटात अभिनयदेखील करणार आहे. अनेक मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम करण्याचा अनेक वेळा योग येतो. त्यांच्याबरोबर मी मला जमेल तसे मराठीत बोलतो. ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात माज्याबरोबर दोन मराठी अभिनेत्री आहेत. सई लोकूर व मंजिरी फडणीस यांच्याबरोबर मी शूटिंगदरम्यान मराठीत बोलायचो. सई लोकूरने मला मराठीचे धडे दिले, असे तो म्हणाला.