रोहितला जेव्हा विचारण्यात आलं की, अजय-काजोल जोडीला घेऊन कोणता सिनेमा करण्याचा विचार आहे का? त्यावर रोहित म्हणाला, सध्या अजय-काजोलला घेऊन सिनेमा करण्यासाठी कोणताही चांगला विषय माझ्याकडे नाही. मात्र, या जोडीला घेऊन फॅमिली कॉमेडी बनवू शकतो. शिवाय, सिनेमातही या दोघांना पती-पत्नीच दाखवायला हवं. दरम्यान, अजय देवगण सध्या ‘शिवाय’ सिनेमात व्यस्त असून, दिवाळीमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. ‘शिवाय’ सिनेमा अजय देवगणसाठी खास अशासाठी आहे की, या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. तर काजोलही नवा सिनेमा करण्याच्या तयारीत आहे. िफल्ममेकर राकेश सांघवींच्या सिनेमात काजोल दिसण्याची शक्यता आहे.
अजय देवगण आणि काजोल दोघेही आपापल्या सिनेमात व्यस्त असले, तरी या दोघांनी लवकरात लवकर एका सिनेमात काम करावं, असंही दोघांच्या चाहत्यांना मनोमन वाटतं आहे.