कथा हीच मराठी चित्रपटांची जान - विजय मौर्य

शनिवार, 31 जानेवारी 2015 (14:51 IST)
गायन क्षेत्रात स्थिरस्थावर झालेल्या नेहा राजपाल हिने तिचा मोर्चा आता निर्मिती क्षेत्राकडे वळवला आहे. नाविन्याची वाट शोधणाऱ्या नेहाने मराठी चित्रपटांच्या निर्मितीतही नशीब आजमावणार आहे. नेहा राजपाल प्रोडक्शन या बॅनर अंतर्गत तिच्या पहिल्या वहिल्या निर्मितीचा श्री गणेशा देखील झाला आहे. व्हॉटस अप च्या माधायामातून चित्रपटातील व्यक्तीरेखांसाठी नव्या चेहऱ्यांचा तिचा शोध चालूच आहे. अशा या गुलदस्त्यात असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक विजय मोर्य करणार आहेत. या चित्रपटाची कथा तशी गंमतीची आणि मजेशीर आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन जुळ्या बहिणी जेव्हा एकाच मुलाच्या  प्रेमात पडतात तेव्हा होणारी धमाल आणि मस्ती चित्रपटात असणार आहे. डॉ. आकाश राजपाल आणि ओमकार मंगेश दत्त या द्वायीनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. सिनेमाची आणखी एक लक्ष्यवेधी  म्हणजे विजय आणि योगेश जोशी यांच्या जोडगोळीने चित्रपटाची पटकथा, संवाद देखील लिहिले आहेत. 'मुंबई मेरी जान', तेंडूलकर आउट या चित्रपटांचे लेखन योगेशने तर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चिल्लर पार्टी या सिनेमाचे लेखन विजयने केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण होणार आहे. जाहिरात क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या विजय यांनी आत्तापर्यंत अनुराग कश्यप, निशिकांत कामत यासारख्या ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. या न्यू इनिग्ज बाबत विजय म्हणतात, मराठी चित्रपटांची कथा हीच त्याची जान आणि जादू असते. त्यामुळे मराठी सिनेमे हे हिंदी पेक्षा वेगळे ठरतात. जे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास भाग पडतात. महत्वाच म्हणजे मराठी  प्रेक्षक अशा सकस चित्रपटांना अधिक पसंती देतात.  त्यामुळे मला खूप आनंद आहे की मराठी चित्रपटाच्या निर्मिताचा भाग बनतोय.

वेबदुनिया वर वाचा