अभिनेते आत्माराम भेंड यांचे निधन

शनिवार, 7 फेब्रुवारी 2015 (14:42 IST)
आपल्या भावनिक अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे (वय ९३) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
 
९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आज बेळगावमध्ये उद्घाटन होत असतानाच भेंडे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने संमेलनावर दु:खाची छाया पसरली असून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
भेंडे यांच्यावर येथील रत्ना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले. अखेरचा श्वास घेतला. अभिनेता, दिग्दर्शक, निमार्ता अशा तिन्ही भूमिका सांभाळताना त्यांनी हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरही कामाचा ठसा उमटवला होता.

वेबदुनिया वर वाचा