जगदीश खेबुडकर यांचे निधन

वेबदुनिया

मंगळवार, 3 मे 2011 (18:31 IST)
गेली अनेक वर्षे आपल्या अवीट गीतांच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर (वय 79) यांचे आज (मंगळवारी) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मूत्रपिंडाच्या विकारामुळे गेल्या 15 दिवसांपासून येथील आधार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

जगदीश खेबुडकर यांचा जन्म 10 मे 1932 मध्ये झाला. त्यांनी 325 चित्रपटांसाठी अडीच हजार गीते लिहिली. तब्बल 48 संगीतकारांनी त्यांच्या गीतांना संगीतबद्ध केले आहे. 36 गायक व 36 गायिका यांनी त्यांची गीते स्वरबद्ध केली आहेत. "गण गवळण' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वाधिक म्हणजे 19 गीते लिहिली. "दुर्गा आली घरा' या चित्रपटामध्ये त्यांचे 16 मिनिटे चालणारे गीत आहे.

वेबदुनिया वर वाचा