World Bank : 2016-17मध्ये विकास दर 6.8 टक्के राहू शकतो

मंगळवार, 30 मे 2017 (11:53 IST)
वर्ल्ड बँकेकडून जारी होणाऱ्या इंडियन डेव्हलपमेंट अपडेटच्या मे महिन्याचा आवृत्तीत म्हटलं आहे की, आर्थिक वर्षाच्या सुरुवातील विकास दराचा वेग थोडा मंदावला आहे.
 
पण अनुकूल मान्सूनमुळे यात थोडा फरक पडेल. पण तरीही नोटबंदीचा विकास दरावर काहीशा प्रमाणात फरक जाणवतो आहे.
 
नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल करण्याची क्षमता आहे. असं मत वर्ल्ड बँकेनं व्यक्त आहे.
 
86 टक्के चलन बाहेर आल्यानं मागील वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबर या त्रैमासिकाच्या विकास दरात घट झाली.
 
याचाच विचार करुन वर्ल्ड बँकेनं असा अंदाज वर्तवला आहे की, 2016-17मध्ये विकास दर 6.8 टक्के राहू शकतो.
 
पण 2017-18 मध्ये यात वाढ होऊन तो 7.2 टक्के तर 2019-20 मध्ये 7.7 टक्के होऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा