माया टाटा आहे कोण? टाटा समूहात नाव चर्चेत आले

सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (18:01 IST)
बुधवारी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाल्याने देशभरात शोककळा पसरली होती. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक नवीन उंची गाठल्या आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून माया टाटा यांचे नाव चर्चेत आले.

अखेर कोण आहे माया टाटा. 
माया टाटा या रतन टाटा यांची पुतणी आहे. त्या टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा आणि अलु मिस्त्री यांच्या कन्या आहेत. माया त्या 34 वर्षाच्या आहे. 

माया टाटा यांचे प्राथमिक शिक्षण भारतात पूर्ण झाले. नंतर त्या उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला गेल्या त्यांनी बायस बिझनेस स्कूल मधून एमबीएचे शिक्षण घेतले. तसेच यांनी वार्विक विद्यापीठात अभ्यास केला. हे शिक्षण घेतल्यानन्तर त्यांनी व्यावसायिक जगात पाऊल टाकले.  

त्यांनी करिअरची सुरुवात टाटा समूह ने केली.जिथे त्यांनी टाटा कॅपिटलची उपकंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये काम केले. येथे त्यांनी गुंतवणूक आणि व्यवस्थापनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले. त्यांच्या कार्याचे कौतुक झाले आणि लवकरच त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी देण्यात आली.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत टाटा समूहासाठी अनेक महत्वाचे योगदान दिले असून टाटा समूहाचे नवीन ॲप, TATA Neu लॉन्च करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. हा प्रकल्प यशस्वी करण्यात माया यांनी धोरणात्मक विचार आणि नेतृत्व कौशल्याने महत्त्वाची भूमिका बजावली.  
 
माया टाटा केवळ व्यावसायिक क्षेत्रातच नव्हे तर सामुदायिक कार्यातही सक्रिय आहेत. टाटा समूहाच्या माध्यमातून त्या शिक्षण, आरोग्य आणि कल्याणाशी संबंधित सामाजिक कार्यक्रमात भाग घेतात. त्यांच्याकडे मजबूत नेतृत्वाचे कौशल्य असून त्यांना टाटा समूहाची नवीन दिशा दाखवण्यास मदत होईल. 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती