गुरुवारी आंदोलनामुळे ‘प्राइम टाइम’बंद

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा’ने (ट्राय) नव्या वर्षांत ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य बहाल करतानाच आणखीही जाचक अटी घातल्याचा आरोप करीत देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवार २७ डिसेंबरला संध्याकाळी सात ते रात्री दहा या वेळेत केबल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे ‘प्राइम टाइम’मधील अनेक मालिकांना प्रेक्षक मुकणार आहेत.
 
या नियमांची आखणी करताना केबल, डीटीएच सेवा देणाऱ्या घटकांचे भविष्य अधांतरी ठेवले आहे. तसेच ग्राहकांसाठीही हे नवे नियम हिताचे नाहीत, असा पवित्रा घेत देशभरातील केबल व्यावसायिकांनी या लाक्षणिक आंदोलनाद्वारे ‘ट्राय’च्या नव्या नियमांचा निषेध नोंदवण्याचे जाहीर केले आहे. ‘ट्राय’चे कार्यालय मुंबईत असावे, हीसुद्धा आंदोलकांची एक प्रमुख मागणी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती