पेट्रोलच्या दराने सध्या उच्चांक गाठला आहे. टोमॅटोच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. 20 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो आता 140 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. त्यामुळे टोमॅटो खायचा की नाही असा प्रश्न अनेकांना पडत आहे. बाजारामध्ये भाजीपाला खरेदीला गेलेल्या व्यक्ती टोमॅटोचे दर ऐकूनच ते न घेणं पसंत करत आहेत.