बीना आधार नंबराचे आता हे काम नाही करून शकणार तुम्ही!

आधार कार्ड नंबर तुमचा व्यापार आणि आधिकारिक घेवाण देवाणच आधार बनत आहे. बर्‍याच जागांवर आधारचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, तसेच लवकरच सरकार शेअर आणि म्युच्युअल फंड खरेदी करण्यासाठी देखील आधारला अनिवार्य करू शकते. जाणून घ्या आधारबिना कोण कोण काम तुम्ही नाही करू शकणार.
 
मोबाईल नंबर 
तुम्हाला एक नवीन मोबाईल नंबर घेण्यासाठी आधार नंबर द्यावा लागणार आहे. त्या शिवाय सध्याच्या नंबराला देखील आधाराने जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.  
 
बँक खाता
बँक खाते उघडण्यासाठी आधार नंबर देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सर्व बँक खाता धारकांना आपल्या बँकांना आधार नंबर द्यावा लागणार आहे. 50,000 रुपये किंवा यापेक्षा जास्तच्या कुठल्याही वित्तीय घेवाण देवाणसाठी देखील आधार अनिवार्य करण्यात आले आहे.  
 
आय कर रिटर्न
सरकारने आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार नंबर देणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या पॅन कार्डसोबत आधार नंबराला लिंक करणे गरजेचे आहे. त्या शिवाय नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी देखील  आधार अनिवार्य केले आहे.  
 
पासपोर्ट
विदेश मंत्रालयाने आधार कार्डला पासपोर्ट आवेदन करण्यासाठी अनिवार्य दस्तावेजांमध्ये सामील केले आहे. आधार नंबर विना तुम्ही आता पासपोर्ट नाही बनवू शकता.  
 
मिड डे मील आणि पीडीएस लाभ
सरकारी वित्त पोषित शाळांच्या विद्यार्थ्यांना आधार कार्डशिवाय मिड डे मील नाही मिळू शकणार. त्याशिवाय पब्लिक डिस्ट्रीब्यूशन बेनिफिट मिळवण्यासाठी देखील आधार नंबर होणे आवश्यक आहे, ज्याला राशन कार्डसोबत जोडावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या सर्वच कल्याणकारी योजनांसाठी आधाराला अनिवार्य करण्यात आले आहे.  
 
भविष्य निधी अकाउंट आणि स्कॉलरशिप
कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ) ने आधार सोबत प्रॉविडेंट फंड अकाउंटला जोडणे जरूरी केले आहे. त्याशिवाय केंद्रीय शिष्यवृत्ती आणि इतर वित्तीय मदत योजनांसाठी आवेदन करणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांचे आधार नंबर द्यावे लागणार आहे.  
 
रेल्वे तिकिटांवर सूट   
भारतीय रेल्वे ने रेल्वे तिकिटांवर सूट घेण्यासाठी आधार नंबर देणे अनिवार्य केले आहे. त्याचे कारण रेल्वे तिकिटांवर देण्यात येणारी सूटेचा दुरुपयोग कमी करणे आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती