सुला विनयार्डसच्या निर्यातीत वाढ, यादीत पोलंडचा समावेश!

प्रगतीच्या वाटेवरील आणखी एक पाऊल, सुला वाईन्स, भारतातील अग्रगण्य वाईन कंपनी आता पोलंडमध्ये देखील वाईन पुरवू लागली आहे, हे जाहीर करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आहे. पोलंडमधील आघाडीची आयातदार “QX” यांच्यासोबत भागीदारी करण्यात आली. भारतातील 65% पेक्षा जास्त बाजारपेठेतील हिस्सा असलेली ही देशातील सर्वात मोठी वाईन उत्पादन करणारी कंपनी आहे. २०१४ साली या कंपनीने निर्यात करण्यास सुरुवात केली आणि आज ती ३० पेक्षा अधिक देशांत वाईन निर्यात करते.
 
जागतिक वाईन नकाश्यावर नाशिकचे नाव ठसवून करून, आता या वाइन निर्यातीत पोलंडचाही समावेश होणे हे सिद्ध करते की, कशाप्रकारे सुला जागतिक सीमांना ओलांडत भारतीय वाईनला जगभरात घेऊन जात आहे. या प्रगतीमुळे, रशिया, पोलंड यांसारख्या बाजारपेठांत, जिथे याआधी भारतीय वाईन्सची निर्यात कधीही केली गेली नाही, तिथे सुला इतर भारतीय वाईन ब्रँडसाठी देखील रस्ता मोकळा करते आहे. सुला वाईन आयात करणे आहे आणि विविध वाईन वितरक तसेच जगभरातील यूनिक वाईन ब्रँडच्या उपभोगत्यांना त्यांनी कधीही न चाखलेली वाईन उपलब्ध करून देणे हे मशजू मसलंका (Mateusz Maślanka) आणि त्यांचे पिता मरेक (Marek) जे यांच्या नेतृत्वाखालील “QX” ह्या सुलाच्या आयातदारांचे प्रमुख ध्येय आहे.
 
या नवीन व्यावसायिक भागीदारीबद्दल बोलताना, QX कंपनीचे CEO मशजू मसलंका (Mateusz Maślanka) म्हणतात, “आम्ही सुला विनयार्ड्सबरोबर झालेल्या ह्या नव्या भागीदारीबद्दल खूपच उत्साहित आहोत आणि मोठ्या आनंदाने आम्ही त्यांची वाईन आमच्या बाजारात उपलब्ध करून देत आहोत. वाईन उद्योग हा जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि पोलिश ग्राहकांना एक विलक्षण वाईन सादर करून या व्यावसायिक चळवळीला पाठिंबा देणे हेच आमचे ध्येय आहे. आमच्या वाईन ब्रँडच्या पोर्टफोलियो हा वैविध्यपूर्ण आणि ओरिजिनल आहे, ज्यात अश्या देशांच्या वाईन्सचा समावेश आहे ज्यांचा जागतिक दर्जाचे वाईन निर्माते म्हणून अजून ओळख निर्माण झालेली नाही.
 
सुला विनयार्डसच्या वाईस प्रेसिडेंट- मार्केटिंग आणि ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर सेसिडिया ओल्डनी त्यांच्या या विस्ताराबाबत सांगतात की, “पोलंड मधील वाईनची मागणी बाजारपेठेत जबरदस्त वाढत आहे तसेच न्यू वर्ल्ड वाइन्सना आता चांगलीच ओळख आणि बाजारपेठेत मागणीसुद्धा मिळत आहे. सुला आ‍ता नवनवीन शिखर पादाक्रांत करत आहे आणि आमचं वितरण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे! आम्ही QX यांचे भागीदार म्हणून खूप आनंदी आहोत कारण ते देखील आमच्यासारखेच उद्यमशील आणि गतिमान आहेत.”
 
QX हे त्यांच्या वाईन्स संपूर्ण पोलंडमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये वितरित करतात. त्यांच्या ग्राहकांच्या यादीत पोलंडमधील काही हाय-प्रोफाइल आउटलेट देखील आहेत, जसे की Warsaw, Krakow, Gdansk, Katowice, Bydgoszcz, आणि Lodz. आज सुलामधील पोलंड येथे उपलब्ध असणार्‍या वाईन्समध्ये ब्रटू ट्रॉपिकाल, सोविनिओ ब्लॉन्क, झिन्फान्डेल, दिंडोरी रिझर्व शिराझ आणि दिंडोरी रिझर्व व्हिओनिए यांचा समावेश आहे.
 
सध्या सुला ३०हून अधिक देशात आपल्या वाईन्स निर्यात करते, ज्यात यूएसए, कॅनडा, जमैका, बेल्जियम, डेन्मार्क, इटली, स्लोवेनिया, हंगेरी, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, लिथुएनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंग्डम, जपान, श्रीलंका, साऊथ कोरिया, सिंगापूर, नेपाल, भूतान, मालदिव्स, युएई, न्यूझीलंड, मॉरिशस, ओमान आणि रशिया यांचा समावेश होतो. आता पोलंडदेखील या यादीत सामील झाल्याने सुला विनयार्डस जगभरात त्याच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एक नवी झेप घेत आहे.
 
ही खरोखरच एक यशस्वी ‘मेक इन इंडिया’ स्टोरी आहे आणि अभिमान बाळगण्यासारखा एक ब्रँड आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती