'या' चिक्कीचे उत्पादन आणि विक्री थांबविली

गुरूवार, 13 डिसेंबर 2018 (09:11 IST)
लोणावळातील मगनलाल फूड्स प्रॉडक्ट्सचे चिक्की उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिला. चिकीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे अन्न व सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याने उत्पादकांना नोटीस जारी करून ही कारवाई केली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
 
मात्र अन्न व सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम ५५ नुसार त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित कंपनीच्या प्रत्येक संचालकाला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, असेही यात स्पष्ट करण्यात आले. कंपनीने खाद्यपदार्थांची कसलीही चाचणी वा तपासणी केली नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे हे खाद्यपदार्थ मानवी सेवनास सुरक्षित असल्याची कसलीही खात्री किंवा हमी नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती