एसबीआयकडून गृह कर्जाच्या दरात 0.25 टक्क्यांची कपात

स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयनं स्वतःच्या गृह कर्जाच्या दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. एसबीआयनं 30 लाखांचे गृह कर्ज 0.25 टक्क्यांनी घटवलं आहे. त्यामुळे आता घर घेण्यासाठी 30 लाखांचं कर्ज घेतल्यास ग्राहकांना त्यावर 8.35 टक्के व्याज द्यावं लागणार आहे. 
 
यापूर्वी एसबीआयच्या गृहकर्जदारांना 8.60 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावं लागतं होतं. कमी रकमेच्या गृहकर्जासोबतच 30 लाखांहून अधिकच्या गृहकर्जावरही व्याजदर कपात केली आहे. 30 लाख रुपयांहून अधिकच्या रकमेवरही व्याजदरातही 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवं घर घेणा-या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. नवे व्याजदर 9 मेपासून 31 जुलैपर्यंत लागू राहतील.

वेबदुनिया वर वाचा