1 मे पासून जीएसटीबाबत सर्वात मोठा बदल होणार आहे. या बदलांतर्गत, आता 100 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या GST व्यवहाराची पावती इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) सात दिवसांच्या आत अपलोड करावी लागेल. अपलोड न केल्यास दंड भरावा लागेल.
महिन्याच्या अखेरीस तेल कंपन्यांकडून आढावा घेतला जातो, ज्यामुळे एलपीजी गॅसच्या किमतीत बदल होण्याची अपेक्षा आहे. 1 एप्रिल रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतीत 91.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती. मार्चमध्ये 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी तर 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 350 रुपयांनी महागला आहे. यावेळीही बदल अपेक्षित आहेत.