भाज्या आणि डाळींच्या किमतीत वाढ

रविवार, 11 जुलै 2021 (11:47 IST)
इंधनाचे वाढते दर आणि लॉकडाऊनचा फटका आता जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होताना दिसत आहे. किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले असून डाळींच्या दरातही 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. 
 
गेल्या काही काळापासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहतूक खर्च महागला आहे. यामुळे पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांतून येणाऱ्या शेतमालाचे दर वधारल्याचे दिसते. तसंच लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे किरकोळ विक्रेत्यांनी किमती वाढवल्याचे निदर्शनास आले आहे.
 
सर्वसामान्य ग्राहकांना मात्र याचा भार उचलावा लागत आहे. मुंबईतील किरकोळ बाजारत भेंडी 60-80 रुपये किलो, कांदा 35-40 रुपये किलो, फ्लावर 60-80 रुपये किलो, गवार 80-100 रुपये किलो अशा दराने विक्री होत आहे. तर तूर, मसूर, मूग डाळींच्या किमतीही 120-140 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती