आरबीआय जुन्या 500, 1000 स्वीकारणार

बुधवार, 21 जून 2017 (17:19 IST)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये पडून असलेल्या जुन्या 500, 1000 च्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वीकारणार आहे. अर्थ मंत्रायलाने याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे.

गेल्या 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर 30 डिसेंबर 2016 पर्यंत बँकांमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील, असं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे. जिल्हा बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज देणंही बँकांना कठिण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानता येईल.   रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरुपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, असं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे. नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पुढचे तीस दिवस ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा