डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:17 IST)
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ देशातील सर्वात जास्त 4 जी डाउनलोड स्पीड देणारी कंपनी ठरली आहे. तर अपलोड स्पीडच्या बाबतीत आयडिया कंपनी(5.6 एमबीपीएस) पहिल्या क्रमांकांवर आहे. जिओनंतर भारती एअरटेलने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्या खालोखाल व्होडाफोन(6.3 एमबीपीएस) आणि आयडिया (6 एमबीपीएस) चा क्रमांक आहे. वोडाफोन आणि आयडिया या दोन कंपन्यांनी वेगवेगळा डेटा जारी केला आहे.
 
जिओच्या उलट भारती एअरटेलच्या डाउनलोड स्पीडमध्ये डिसेंबर महिन्यात थोडी सुधारणा झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात एअरटेलचा 4जी डाउनलोड स्पीड 9.7 एमबीपीएस होता. तो डिसेंबरमध्ये 9.8 एमबीपीएस झाला. जिओप्रमाणे व्होडाफोनच्याही 4 जी डाउनलोड स्पीडमध्ये डिसेंबर महिन्यात घट होऊन 6.3 एमबीपीएस इतका झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात 6.8 एमबीपीएस इतका होता. आयडियाचा नेटवर्क स्पीड 6.2 एमबीपीएस वरून कमी होऊन तो 6 एमबीपीएसवर आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती