रिलायन्स जिओचा 5G डेटासह सबस्क्रिप्शन प्लॅन सादर, जाणून घ्या फायदे

रविवार, 10 डिसेंबर 2023 (13:22 IST)
Reliance Jio : देशातील नंबर वन टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक वर्ष पूर्ण होण्याआधी एक मोठी भेट दिली आहे. कंपनीकडे असे अनेक प्लॅन उपलब्ध आहेत, पण जिओने एक नवीन स्वस्त आणि स्वस्त प्लॅन आणला आहे. या मध्ये डेटा फ्री  कॉलिंग आणि OTT प्लॅन मिळेल.
 
Jio ने 2023 च्या अखेरीस 909 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 44 कोटींहून अधिक ग्राहकांना अप्रतिम ऑफर देत आहे. विशेष बाब म्हणजे हा प्लान दीर्घ वैधता आणि भरपूर डेटा एकत्र देतो. आम्ही तुम्हाला सांगतो की जिओचा हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. 
 
जिओ ने एक दुसरा प्लॅन देखील आणला आहे. या मध्ये यूजर्सना संपूर्ण वैधतेसाठी 168GB डेटा मिळतो, म्हणजेच तुम्ही दररोज 2GB डेटा वापरू शकता. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 100 एसएमएस मिळतील. हा प्लॅन घेतल्यानंतर, तुम्ही 84 दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकता.
 
 यासोबतच कंपनी आपल्या यूजर्सला या प्लानमध्ये अमर्यादित 5G डेटाचा अॅक्सेस देखील देत आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध अमर्यादित 5G डेटा म्हणजे तुम्ही 30 दिवसांमध्ये जास्तीत जास्त 300GB डेटा मिळेल.या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये जिओ आपल्या ग्राहकांना OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.
 
Edited by - Priya Dixit     
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती