आरबीआय 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या तयारीत?

शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:48 IST)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे.
 
आरबीआय मार्च किंवा एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
 
आरबीआयकडून बँकांना नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगितलं आहे. यामुळे बँकेत जमा झालेल्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी तयारी केली आहे.
 
यावेळी बी महेश म्हणाले की, "10 रुपयांचं नाणं आणून 15 वर्षं झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. 10 रुपयांची नाणी बँकांसाठी मोठं ओझं झालं आहे".

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती