आरबीआयनं रेपो रेटमध्ये चौथ्यांदा कपात करत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं आता गृहकर्ज स्वस्त होणार आहे. आरबीआयचे रेपो रेट 6.25 टक्क्यांनी कमी होऊन 6 टक्क्यांवर आले आहेत. तर रिव्हर्स रेपो रेट कमी होऊन 5.75 टक्के झाले आहेत. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं सामान्य माणसाच्या डोक्यावरील कर्ज काही प्रमाणात कमी होणार आहे. रेपो रेट कमी झाल्यामुळे 20 वर्षांसाठी घेतलेल्या 30 लाखांच्या गृहकर्जातील जवळपास 1.14 लाख रुपये कमी होणार आहेत.