रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीनंतर अर्थात 9 नोव्हेंबरपासून खात्यात दोन लाख किंवा त्याहून जास्त रक्कम असणाऱ्या खात्यांवर काही बंधनं येणार आहेत. 9 नोव्हेंबरनंतर खात्यात दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या ज्या बँक खात्यात 5 लाखाच्या वर बॅलन्स असेल अशा खात्यांमधली रक्कम काढण्यावर बंधनं येणार आहेत. पॅन कार्ड दाखवून किंवा फॉर्म 60 भरुनच या खातेधारकांना पैसे काढता येणार आहेत. अन्यथा या खात्यांमधून पैसे ट्रान्सफरही करता येणार नाहीत. जनधन खात्यांमध्ये वर्षाकाठी फक्त 50 हजार रुपये जमा करण्याची मुभा आहे. तर महिन्याला 10 हजार (केआयसी नसल्यास फक्त पाच हजार) रुपयांची रक्कम काढता येईल.