मिस्त्री हटविणे ही गरजच - रतन टाटा

भारतातील आणि जगातील देशाची ओळख असलेल्या टाटा समूहात सध्या मोठे वाद सुरु आहेत. सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्ष पदावरून दूरू केले गेले आणि अचानक टाटा पुन्हा चर्चेत आले. यावर रतन टाटा यांनी मौन सोडले आहे. टाटा उद्योग समूहाच्या भविष्यासाठी आणि यशस्वी होण्याकरिता  सायरस मिस्त्री  चेअरमन पदावरून हटविणे आवश्यकच होते, असे मत  या समूहाचे हंगामी चेअरमन रतन टाटा यांनी व्यक्त  केले आहे. रतन टाटा  यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला एक पत्र पाठविले असून त्यात हा उल्लेख केला आहे.
 
टाटा पुढे उद्देशून लिहितात की कंपनीच्या संचालक मंडळाने विचारपूर्वक निर्णय घेतला असून   मिस्त्री यांना बाजूस केले  आहे. अत्यंत गांभीर्याने विचार केल्यानंतर मिस्त्री यांना हटविणे कंपनीच्या यशस्वी भविष्यासाठी आवश्यकच आहे, असा निष्कर्ष संचालक मंडळाने काढला आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. आपण स्वीकारलेली जबाबदारी हंगामी स्वरूपाची आहे. कंपनीला लवकरच योग्य नेतृत्व दिले जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे. सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांना लक्ष केले होते त्याचा परिणाम बाजारात सुद्धा झाला होता, आता टाटा समुहाचा बाजारातील पत सुधरवने आणि योग्य अध्यक्ष देणे हे काम आता रतन टाटा यांना करावे लागणार आहे.तर  मिस्त्री विरुद्ध टाटा हा वाद काही काल तरी सुरु राहणार आहे.

वेबदुनिया वर वाचा