व्यापार्यांना एका संघटनेद्वारे सरकाराला अशाप्रकारचा सल्ला देण्यात आला आहे. बजेट तयार होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या मोठ्या अधिकार्यांच्या भेटी ही संघटना घेत असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. चेक बाउन्स होण्याच्या घटनांमुळे अनेक व्यापारी ग्राहकांकडून चेक घेण्यास काचकुच करतात. त्यामुळे बाउन्स प्रकरणी कठोर कायदा तयार करण्यात यावा अशी या व्यापार्यांची मागणी आहे. चेक बाउन्स प्रकरणी संबंधित व्यक्तीला एका महिन्याच्या आत तुरुंगात पाठवावे अशी सूचना संघटनेने केल्याचे वृत्त आहे.