केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी आणि अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ करण्यात आलाय. गेल्या दोन तिमाहीत हे व्याजदर जैसे थे होते. जानेवारी ते मार्च २०१८ या तिमाहीसाठी व्याजदरात कपात करण्यात आली होती. ती पुढे कायम ठेवण्यात आली होती. आता या वाढ करण्यात आल्याने जीपीएफ धारकांना मोठा दिलासा मिळालाय. केंद्रीय वित्त विभागाने आज एक परिपत्रक काढून व्याजदरवाढीची घोषणा केली.