PM शेतकऱ्याची रक्कम 12000, या दिवशी येऊ शकते 10 वा हप्ता

गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (18:38 IST)
पीएम किसान सन्मान निधी 2021 ताज्या बातम्या: यूपी-पंजाबसह अनेक राज्यांमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकतात. 15 डिसेंबरपर्यंत पीएम किसानचा हप्ता 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी सध्या ही चर्चा सर्वत्र सुरू आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 ऐवजी तीन समान हप्त्यांमध्ये 12000 रुपये देणार आहे. याशिवाय सामान्य शेतकऱ्यांनाही अपेक्षा आहे की 2024 पूर्वी किंवा डिसेंबर 2021 मध्येच सरकार पीएम किसानची रक्कम वाढवू शकते. गेल्या तीन महिन्यांपासून ही बाब शेतकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत भेट घेतल्याने या चर्चेला बळ मिळाले. मीडिया रिपोर्ट्समध्ये, पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम दुप्पट होणार असल्याच्या मंत्र्यांच्या वक्तव्याबाबत बातम्या आल्या होत्या. यासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे.
आत्तापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 2000-2000 रुपयांचे 9 हप्ते जारी केले आहेत. पहिला हप्ता म्हणून 3,16,08,941 शेतकर्‍यांच्या खात्यावर 2000 रुपये पोहोचले, तर 9व्या हप्त्यात आतापर्यंत 10,79,44,942 शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे पाठवले गेले आहेत. आता 30 नोव्हेंबरपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर 9व्या हप्त्याची रक्कम पाठवली जाणार आहे. यानंतर, पीएम किसानचा 10 वा हप्ता 1 डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2022 दरम्यान येणे सुरू होईल. 15 डिसेंबर किंवा त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता येण्याची शक्यता आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती