देशभर पेट्रोलचे दर रोज बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात 16 जूनपासून पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. पेट्रोल पंप चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यामुळे पेट्रोलचे दर रोज बदलण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयाला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही, असे म्हणत पेट्रोलपंपमालकांनी 16 जूनपासून संप पुकारला होता.