Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्या दिवशीही वाढ

शनिवार, 12 जून 2021 (12:05 IST)
पेट्रोल- डीझेल ने आता महागाईचा उचांक गाठला असून डिझेलच्या किंमतीत लागलेली आग सध्या तरी कमी झालेली दिसत नसून ती भडकत आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आपला जुना विक्रम तोडून नवीन विक्रम करत आहेत. 2014 ते 2021 या सात वर्षापर्यंत पेट्रोल 30 रुपयांनी तर डिझेल 36 रुपये प्रति लिटर महागले आहे.
 
सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी सलग दुसर्यात दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 27 पैसे आणि डिझेलच्या दरात 23 पैशांची वाढ केली आहे. यापूर्वी शुक्रवारी म्हणजेच 11 जून रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 29 पैसे आणि डिझेलच्या दरात 28 पैशांची वाढ झाली होती.
 
या वाढीमुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.12 रुपये तर डिझेलची किंमत 86.98 रुपये प्रतिलिटर झाली आहे. 
त्याचबरोबर मुंबईतील पेट्रोलची किंमत 102.30 रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 94.39 रुपये आहे. 
कोलकातामध्ये पेट्रोल 96.06 रुपये तर डिझेल 89.83 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. 
चेन्नईमध्ये पेट्रोल 97.43 रुपये आणि डिझेल 91.64 रुपयांना विकले जात आहेत.
एका अहवालानुसार, देशातील 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. यावर्षी पेट्रोलच्या किंमतीत 13% वाढ झाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती