पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले

शनिवार, 21 एप्रिल 2018 (10:05 IST)
देशात पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८१ रुपये ९३ पैसे तर डिझेल लिटरमागे ६९ रुपये ५४ पैसे इतके झाले आहे. साडेचार वर्षांतील या सर्वोच्च दरावरून केंद्रातील भाजप सरकारवर विरोधकांनी शरसंधान केले असून इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तसेच महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
 
पेट्रोलचे लिटरमागे दर दिल्लीत सर्वात कमी म्हणजे ७४ रुपये आठ पैसे आहेत. कोलकात्यात हेच दर ७६ रुपये ७८ पैसे तर चेन्नईत ७६ रुपये ८५ पैसे आहेत. डिझेलचे दरही लिटरमागे दिल्लीतच सर्वात कमी म्हणजे ६५ रुपये ३१ पैसे आहेत. तर हेच दर कोलकात्यात ६८ रुपये एक पैसा तर चेन्नईत ६८ रुपये ९० पैसे आहेत.
 
पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या ‘ओपेक’(ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्पोर्टिग कंट्रीज) या संघटनेने आपल्या पुरवठय़ात कपात केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती