खासगी ट्रेन चालवण्यासाठी मुंबई- नवी दिल्ली, चेन्नई- नवी दिल्ली, नवी दिल्ली- हावड़ा, शालीमार- पुणे, नवी दिल्ली- पाटणा अशा काही मार्गांची निवड करण्यात आली आहे.
खासगी ट्रेन चालविण्यात इच्छुक कंपन्यांमध्ये अल्स्टॉम ट्रान्सपोर्ट, बॉम्बार्डियर, सीमेंस एजी, ह्युंदाई रोटेम कंपनी आणि मॅकक्वेरी यासह अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा समावेश आहे. तर देशातील टाटा रियल्टी अँड इंफ्रास्ट्रक्चर, हिताची इंडिया आणि साउथ एशिया, एस्सेल ग्रुप, अदानी पोर्ट्स आणि सेझ, भारतीय रेल्वे केटरिंग अॅड टुरिझम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे.