आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने आता नोटाबंदीच्या काळात बॅंकेने स्वीकारलेल्या 342 कोटी रुपयांच्या नोटा सरकारने स्वीकारल्या नाहीत. तर राजीनामे देऊ असा इशारा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी दिला आहे. तर दुसरीकडे 10 लाख खातेधार, शेतकरी, नोकरदार वर्ग बॅंकेमुळे पूर्णपणे अडचणीत आला आहे. मागच्या सहा महिन्यात गैरव्यवहाराचे आरोप, नोटाबंदीचा परिणाम यामुळे बॅंक डबघाईला आली आहे. त्यात जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याने जिल्हा बॅंकेच्या अस्तित्वाबाबत आता पुन्हा प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे.