स्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांसाठी नवी सेवा

शनिवार, 2 डिसेंबर 2017 (10:29 IST)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी नवी सेवा सुरु केली आहे. यात बँकेचं डेबिट कार्ड आहे पण त्याच्यावर तुमचा फोटो नाहीये आणि त्यावर फोटो हवा असेल तर त्यासाठी ही नवी सेवा उपयोगी ठरणार आहे.डेबिट कार्डवर फोटो लावण्यासाठी तुम्हाला एसबीआयच्या ब्राँचमध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्ही अवघ्या काही मिनिटांत फोटो असलेलं डेबिट कार्ड प्राप्त करु शकता. यासाठी बँकेने २५७ ब्राँचला फिजिटल (Phygital) केलं आहे.

या ठिकाणी आठवडे किंवा महिन्याभरात होणारं काम अवघ्या काही मिनिटांत होणार आहे. जर तुम्हालाही फोटो असलेलं डेबिट कार्ड हवं असेल तर त्यासाठी sbiINTOUCH ब्राँचमध्ये अकाऊंट सुरु करावं लागणार आहे.अकाऊंट ओपनिंग कियोस्क (AOK)च्या माध्यमातून ही सर्व कामं अवघ्या काही स्टेप्समध्ये केली जाऊ शकतात. यासोबतच डेबिट कार्ड प्रिंटिंग कियोस्कच्या माध्यमातून तुम्ही फोटो असलेलं डेबिट कार्ड अवघ्या १५ मिनिटांत प्राप्त करु शकाल.

याशिवाय SBIच्या सहयोगी कंपन्या म्हणजेच लाईफ इन्श्युरन्स, जनरल इन्श्युरन्स, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड आणि एसबीआय कॅप सिक्युरिटीज संबंधित ऑनलाईन ट्रेडिंगची काम करु शकणार आहात. ज्या ब्राँचमध्ये ही काम केली जाणार आहेत त्या ब्राँचला बँकेने sbiINTOUCH नाव दिलं. आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती