4 मे पासून बँकेतून पैसे काढण्याचे नियम बदलणार, जाणून घ्या नवीन नियम

सोमवार, 4 मे 2020 (10:29 IST)
आजपासून बदलेल्या नियमांप्रमाणे आता आपण बँकेतून पैसा तेव्हा काढू शकाल जेव्हा आपल्या बँक खात्याच्वा शेवटला अंक, अनुमती प्राप्त तारेखेसोबत जुळत असेल नाहीतर पैसे काढता येणार नाही. इंडियन बँक एसोसिएशनने लॉकडाउन दरम्यान बँकेंतून पैसे निकासीसाठी नवीन नियम काढले आहे. एसोसिएशनने ग्राहकांना बँकेत गर्दी करु नये अशी विनंती केली आहे. 
 
गर्दी होऊ नये म्हणून सोशल डिस्‍टेंसिंगचा नियम पाळत बँकेतून पैसे काढण्यासाठी काही तारखा निश्चित केल्या गेल्या आहे. ही व्यवस्था खाताधारकाच्या खात्याच्या शेवटलच्या डिजिटवर आधारीत आहे. सध्या हा नियम 11 मे पर्यंत लागू असणार आहे. याला बँकिंग Odd Even सिस्‍टम म्हटता येईल.
 
ज्यांचे अकाउंट नंबरचा शेवटला अंक 0 ते 1 यामधील आहे ते 4 मई रोजी पैसे काढू शकतात. याच प्रकारे शेवटले डिजीट 2 आणि 3 असणारे 5 मे रोजी पैसे काढू शकतील. या क्रमानुसार खाता क्रमांक 4 आणि 5 हे शेवटचं अंक असणारे ग्राहक 6 मे रोजी तर ज्या ग्राहकांचे खाते नंबरचा शेवट 6 आणि 7 आहे ते 8 मे रोजी पैसे काढू शकतील आणि 8 आणि 9 शेवटला डिजीट असणारे खाताधारक आपल्या बँक खात्यातून 11 मे रोजी पैसे काढू शकतील. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती