सर्वसामान्यांना महावितरणचा झटका, विजेच्या दरात केली वाढ

मंगळवार, 14 जून 2022 (12:17 IST)
राज्यातील जनतेला महावितरणाचा मोठा शॉक दिला आहे. महावितरणने गुपचूपपणे विजेच्या दरात वाढ केली आहे. यासाठी इंधन समायोजन शुल्काचा आसरा घेतला आहे. वीज प्रति युनिट 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत महाग झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने 30 मार्च 2020 ला दिलेल्या आपल्या आदेशात हे शुल्क शून्य केले होते. लोडशेडिंग टाळण्यासाठी महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली. वीज दरवाढीसाठी महावितरणने एफएससी म्हणजेच इंधन समायोजन शुल्कचा आसरा घेतला आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आलेल्या या शुल्कामुळे विजेच्या दरात प्रति युनिट 5 ते 25 पैशांची वाढ झाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती