आणखी १५ औषधांच्या किमती 'एनपीपीए'कडून निश्‍चित

शनिवार, 29 एप्रिल 2017 (08:16 IST)
राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरण (एनपीपीए)ने आणखी १५ औषधांच्या किमतीची र्मयादा निश्‍चित केलेली आहे. यात हृदय रोग, संसर्ग, कर्करोग (कॅन्सर), बीपी आणि वेदनाशामक (पेनकिलर) औषधांचा समावेश आहे. एका अधिसूचनेत औषधी किंमत नियामक असलेल्या राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरण (एनपीपीए)ने म्हटले आहे की, औषधी किंमत नियंत्रण आदेशाच्या अंतर्गत १५ औषधांच्या किमतींना नियंत्रित करण्यात आले आहे. ज्या औषधांच्या किमतींना निश्‍चित केले आहे, यात अँटी-बायोटिक वँकोमायसीन, कॅन्सरच्या उपचारासाठी वापरली जाणारी अँटोपोसाईड, रक्तदाब (बीपी)ची औषध नोराड्रेनालाईन आणि हृदय रोगाच्या उपचारासाठी कामात येणारी डिजोक्सिन इत्यादीचा समावेश आहे. एनपीपीएने या औषधांच्या उत्पादकांकडून किंमत मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा