मारुती सुझुकीची ग्राहकांसाठी नवीन ऑफर, ‘बाय नाऊ, पे लेटर’

शनिवार, 23 मे 2020 (21:53 IST)
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना एक नवीन ऑफर दिली आहे. ‘बाय नाऊ, पे लेटर’ (आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या) अशी ही ऑफर आहे. यामध्ये कंपनीने 90 टक्के ऑन-रोड फंडिंग आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासह इतर पर्याय देखील दिले आहेत.
 
नवीन फायनान्स योजनांसाठी मारुती सुझुकीने चोलामंडलम इनव्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड (सीआयएफसीएल) सह भागीदारी केली आहे. बाय नाऊ पे लेटर योजने अंतर्गत, मारुती कार खरेदी करणाऱ्या ग्राहकाला ईएमआय सुरू करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी मिळेल. याचा अर्थ जर आपण आता मारुतीची कार खरेदी केली, तर याचे ईएमआय कार कर्ज घेतल्याच्या 2 महिन्यांनंतर सुरू होईल. ही ऑफर मारुतीच्या निवडक कारवर उपलब्ध आहे. 30 जून 2020 रोजी किंवा त्यापूर्वी घेतलेल्या कर्जावर ही ऑफर लागू होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती