ड्युअल एअरबॅगसह नवीन महिंद्रा बोलेरो लॉन्च, वैशिष्टये आणि किंमत जाणून घेऊ या

मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (16:22 IST)
महिंद्रा अँड महिंद्राने भारतीय बाजारपेठेत ड्युअल फ्रंट एअरबॅगसह त्यांचे लोकप्रिय वाहन बोलेरो सादर केले आहे आणि सध्या बेस व्हेरिएंट साठी  8.85 लाख रुपये आहे. आणि टॉप-स्पेक ट्रिमसाठी 9.86 लाख रुपये. या दोन्ही किमती एक्स-शोरूम मुंबईनुसार आहेत. फ्रंट पॅसेंजर-साइड एअरबॅग कस्टमाइझ  करण्यासाठी आतील भाग थोडेसे अपडेट करावे लागले. डॅशबोर्डवरील ग्रॅब हँडलला रेग्युलर पॅनेल मिळते आणि सेंटर कन्सोल नवीन लाकडी गार्निशने पूर्ण केले गेले आहे. महिंद्रा बोलेरोसह एक नवीन टू -टोन पेंट योजना सादर करू शकते कारण ते चाचणी दरम्यान पाहिले गेले होते आणि सध्या तीन सिंगल-टोन रंग ऑफर केले जातात.
 
फ्रंट पेसेंजर एअरबॅग जोडण्याव्यतिरिक्त, SUV मध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. अपडेटेड व्हेरियंटच्या समावेशासह, बोलेरोच्या किमती 16,000 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. वाढलेल्या किमती बोलेरोच्या प्रकारावर अवलंबून आहेत कारण बोलेरो B4, B6 आणि B6 ऑप्शनल ट्रिममध्ये उपलब्ध आहे.
 
महिंद्र बोलेरोची वैशिष्ट्ये 
बोलेरोची विक्री जवळपास दोन दशकांपासून सुरू आहे आणि ती स्कॉर्पिओसह महिंद्रासाठी चांगली कामगिरी करत आहे. महिंद्रा बोलेरोच्या वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये ऑडिओ सिस्टम, मॅन्युअल एसी, कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, हाय-स्पीड वॉर्निंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB आणि ऑक्स प्रोव्हिजनचा समावेश आहे. 
 
परफॉरमन्स साठी, 1.5-लिटर तीन-सिलेंडर mHawk75 डिझेल इंजिन वापरले जाते आणि 75 hp चे मॅक्सिमम पॉवर आउटपुट आणि 210 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. पॉवरट्रेन केवळ पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेली आहे जी केवळ मागील चाकांना पॉवर हस्तांतरित करते. या वर्षाच्या मध्यंतरात स्कार्पिओला मोठे अपडेट मिळू शकते आणि येत्या काळात नेक्स्ट जनरेशनची बोलेरो सादर केली जाऊ शकते. 
 
2022 महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये आत आणि बाहेर बरेच बदल होणार आहेत आणि ते अपडेट केलेल्या लेडर फ्रेम चेसिसवर बेस्ड असू शकते. यामध्ये डिझाईनमध्ये बरेच बदल केले जाऊ शकतात तर इंटीरियर देखील पूर्णपणे बदलले जाईल. कामगिरीसाठी, ते थार सारखे 2.2-लिटर डिझेल आणि 2.0-लिटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह ऑफर केले जाईल.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती