टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने क्रिकेटप्रेमींसाठी नवीन क्रिकेट प्लॅन जाहीर केला आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 लक्षात घेऊन या योजना सादर करण्यात आल्या आहेत. प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटा आणि फ्री डेटा व्हाउचरचा लाभ मिळेल. या प्लॅनची सुरुवातीची किंमत 219 रुपये आहे. या प्लॅन्ससोबत कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर सुविधाही देत आहे. कंपनी 24 मार्च 2023 पासून या योजना उपलब्ध करून देत आहे.
जिओचा 219 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन-
जिओच्या 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3 जीबी डेटाचा लाभ मिळतो. प्लॅनसोबत 14 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 25 रुपयांचे फ्री व्हाउचर देखील उपलब्ध असतील. वापरकर्ते प्लॅनसह उपलब्ध असलेल्या मोफत व्हाउचरमधून 2 जीबी अतिरिक्त डेटा देखील घेऊ शकतील.
जिओचा 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन-
जिओच्या या प्लॅनमध्येही दररोज 3 जीबी डेटाचा लाभ मिळतो. 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण 28 दिवस अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 3 GB डेटा दिला जातो. प्लॅनसह, 61 रुपयांचे मोफत व्हाउचर मिळेल, जे 6GB डेटा जोडण्याची परवानगी देईल.
Jio चा 999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन-
जिओच्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तीन महिन्यांची वैधता मिळते. तर, प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा उपलब्ध आहे. प्लॅनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 241 रुपयांचे मोफत व्हाउचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने गरज असंल्यास 40 GB पर्यंत अतिरिक्त डेटाचा लाभ घेऊ शकाल.
जिओचा क्रिकेट डेटा अॅड-ऑन प्लॅन
जिओने या तीन प्लॅनसह तीन नवीन अॅड-ऑन प्लॅन्सही लॉन्च केले आहेत. या प्लॅनमध्ये 50 GB, 100 GB आणि 150 GB पर्यंत अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. सर्वात स्वस्त क्रिकेट डेटा अॅड-ऑन प्लॅनची किंमत 222 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 50 जीबी डेटा अॅड-ऑन करता येतो.