देशातील मुख्य आयटी कंपनी इंफोसिसने 10 हजार अमेरिकांना नोकरी देण्याचा ऍलन केला आहे. इंफोसिसने ट्विट करून या गोष्टीची माहिती दिली आहे. आता कंपनीच्या एकूण कर्मचार्यांची संख्या किमान दोन लाख आहे. यात किमान दोन हजार अशे लोक आहे ज्यांना अमेरिकेत मागील काही वर्षांपासून नोकरीवर ठेवण्यात आले आहे.
कंपनीचा हा ऍलन अशा वेळेस आला आहे जेव्हा अमेरिकी प्रशासनाकडून एच-1बी वीजाबद्दल फारच कडक नियमांच्या गोष्टी करण्यात येत आहे. तकनीकमध्ये दक्ष किमान 65 हजार लोकांना प्रत्येक वर्षी अमेरिका एच-1बी विजा करून देतो. त्याशिवाय 20 हजार विजा त्या लोकांना देण्यात येतात ज्यांनी अमेरिकेत एडवांस डिग्री मिळवली आहे.
अमेरिकी प्रशासनाने नुकतेच असा आरोप लावला होता की इंफोसिस आणि टीसीएस जास्त विजा मिळवण्यासाठी लॉटरी सिस्टममध्ये जास्त संख्येचे आवेदन करतात. सॉफ्टवेयर कंपन्यांची संस्था नॅस्कॉमचे आकडे सांगतात की 2014-15मध्ये दोन्ही कंपन्यांना साडे सात हजारांपेक्षा जास्त विजा मिळाला, जो एकूण संख्येचा किमान 8.8 टक्के होता.
सध्या, इंफोसिसचे म्हणणे आहे की अमेरिकिलोकांसाठी नवीन नोकर्या पुढील दोन वर्षांमध्ये देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी चार टेक्नॉलॉजी आणि इनोवेशन हब उघडण्यात येतील. यातून पहिला हब या वर्षी ऑगस्टपर्यंत इंडियानामध्ये उघडण्यात येईल, ज्यात 2021 पर्यंत अमेरिकिलोकांसाठी किमान दोन हजार नोकरी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांचे म्हणणे आहे की, “ अमेरिकेत आपल्या ग्राहकांसाठी डिजीटल भविष्याला साकार करण्यासाठी कंपनी पुढील दोन वर्षांमध्ये तांत्रिकरीत्यात दक्ष 10 हजार अमेरिकी लोकांना नोकरी देण्यासाठी प्रतिबद्ध आहे.”
अमेरिकेत इंफोसिस फाउंडेशनच्या माध्यमाने 2015पासून आतापर्यंत 1.34 लाख विद्यार्थी, अडीच हजारांपेक्षा जास्त शिक्षक आणि अडीच हजारांपेक्षा जास्त शाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. फाउंडेशन कोड डॉट ओआरजी आणि सीएसटीए सारख्या संस्थेशी भागीदारी करून प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येत आहे.