इंडसइंड बँकने टच बटण असणारा इंटरॅक्टिव कार्ड नेक्स्ट सादर केला आहे. आता तुम्ही बसल्या बसल्या या कार्ड द्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट, रिवार्ड प्वाइंट्स आणि कुठल्याही खरेदीला ईएमआयमध्ये बदलण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. जेव्हा की सामान्य कार्डमध्ये तुम्हाला स्वत:ला बँकेशी संपर्क साधावा लागतो. मॉडर्न टेक्नॉलॉजी द्वारे तयार या क्रेडिट कार्डमध्ये काही असे बटण लागले आहे. यात तीन प्रमुख बटण आहे. एक 'ईएमआय द्वारे भरा', दुसरा 'रिवॉर्ड्स प्वॉइंट्स खर्च करा', तिसरा 'क्रेडिट कार्डाद्वारा भरा'.
याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही शॉपिंग करता, त्यानंतर तुम्ही ईएमआयच्या माध्यमाने भुगतान करण्यास इच्छुक असाल, रिवॉर्ड प्वॉइंट्सचा वापर करण्यास इच्छुक असाल किंवा क्रेडिट कार्डद्वारे सरळ खर्च करण्यास इच्छुक असाल. तुम्हाला ज्या विकल्पाचा वापर करायचा असेल त्याच्या समोरच्या बटणाला प्रेस करायचे आहे. बटण प्रेस करताच हलकी लाइट लागेल.
जर तुम्ही ईएमआय ने सामान घेण्याची योजना आखत असाल तर त्यासाठी जसेच तुम्ही ईएमआयच्या बटणाला प्रेस कराल. त्याच्या जवळच तुम्हाला 3,6,12, आणि 24 महिन्याच्या हफ्त्यात भुगतान करण्याचा मोका मिळेल.