पारंपारिकपणे, गुढी पाडव्याचा दिवस हा मोठ्या किंमतीच्या खरेदीसाठी एक शुभ दिवस मानला जातो कारण तेव्हापासून महाराष्ट्रमध्ये नवीन वर्षाची सुरूवात होते. हा प्रसंग साजरा करण्यासाठी लोक बहुतेकदा सोन्यासारख्या पारंपारिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात किंवा एखादी नवीन कार किंवा घर विकत घेतात, ही एक समृद्ध सुरुवात दर्शविणारी चाल आहे. या भावनांच्या परिणामी, अनेक रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपन्या देखील नवीन प्रकल्पांची घोषणा करतात किंवा खरेदीदारांना आकर्षक ऑफर देतात. तथापि, शेअर बाजारामध्ये सतत होणारी अस्थिरता, कमकुवत आर्थिक मॅक्रो निर्देशक आणि कोरोनाव्हायरसच्या प्रसाराबद्दल चिंतेमुळे, निवासी रिअल इस्टेट क्षेत्रातील नवीन लॉन्च मंद राहण्याची शक्यता आहे.
कोविड -१९ च्या उद्रेकास आळा घालण्यासाठी मोठ्या संमेलनावर बंदी तसेच सोशिअल डिस्टनसिंग यासारख्या खबरदारी घेण्याची तयारी सरकार करीत असताना, आम्ही विकासशील प्रकल्पांमध्ये फूटफॉल आणि कस्टमर विझिट कमी होण्याची अपेक्षा करत आहोत- ग्राहकांच्या मागणीचे विक्री मध्ये रूपांतर करणारे एक महत्त्वपूर्ण घटक.
रिअल इस्टेट क्षेत्र गेल्या काही काळापासून क्रेडिट आणि लिक्विडिटी क्रंचची आव्हाने झेलत आहे, विशेषत: मागणी कमी होत असताना. विक्रीच्या पारंपारिक काळाने मागील काही वर्षांत वापरकर्त्याच्या मागणी प्राप्त करण्यात अयशस्वी ठरली ज्यामुळे खंड ठप्प झाला आहे. सरकार रिअल इस्टेटचा अजेंडा पुढे नेत आहे पण प्रामुख्याने ते “परवडणाऱ्या घरांच्या” प्रति असून सवलत या खंडापुरतेच मर्यादित आहेत. याने मोठ्या प्रमाणात मध्यम व हाय-एन्ड प्रकल्पांना असहाय्य स्थितीत सोडून दिले आहेत.