व्यापार्‍यांनी बुडवला 34 हजार कोटींचाजीएसटी?

मंगळवार, 13 मार्च 2018 (11:15 IST)
देशातल्या व्यापार्‍यांनी सुारे 34 हजार कोटी रुपयांचा जीएसटी बुडवला असल्याची शक्यता आयकर विभागाने व्यक्त केली आहे. आयकर परताव्यांचे प्राथमिक विश्लेषण केल्यावर ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दिशेने आयकर विभाग आता सखोल तपास करत आहे. जीएसटी कौन्सिल बैठकीत हा मुद्दा पुढे आला आहे.
 
ज्या व्यापार्‍यांनी जीएसटी रिटर्न्स-1 आणि जीएसटी रिटर्न्स-3बी मध्ये वेगवेगळी देयके दाखवली आहेत, त्या सर्व व्यापार्‍यांना नोटीस पाठवली जाऊ शकते. ज्या लोकांनी दोन्ही रिटर्न्स फायलिंगमध्ये मोठे अंतर ठेवले आहे, त्यांच्यावर विशेष नजर ठेवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 'संशयास्पद' करदात्यांची माहिती राज्यांना दिली जाणार आहे, जेणेकरून या करदात्यांवर कारवाई करता येईल.
 
याशिवाय आयात केलेल्या उत्पादनांची किंमत खूप कमी दाखवली गेली असल्याचा निष्कर्ष सीमा शुल्क विभागाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर काढण्यात आला आहे. 
 
सरकार करचोरी रोखण्यासाठी विविध उपाय योजण्यात कमी पडले असल्याने जीएसटीचे एकूण संकलनही कमी झाले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती