Gold rate सोने ₹ 90 महाग, चांदी ₹ 957 तुटली, जाणून घ्या संपूर्ण आठवडा बाजाराची स्थिती

शनिवार, 17 डिसेंबर 2022 (16:23 IST)
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. तर चांदी स्वस्त झाली आहे. या व्यावसायिक सप्ताहात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 90 रुपयांची किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे, तर चांदीच्या दरात 957 रुपयांची घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (12 डिसेंबर ते 16 डिसेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 53,908 होता, जो शुक्रवारपर्यंत 53,998 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्ध चांदीची किंमत 67,022 रुपयांवरून 66,065 रुपये प्रति किलोवर आली आहे.
 
उल्लेखनीय आहे की IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA द्वारे जारी केलेले दर देशभरात सामान्य आहेत परंतु त्यांच्या किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
Edited by : Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती